Mumbai News : मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालांचा वाद आता नवीन राहिलेला नाही. काही दिवसापूर्वी पायउतार झालेले आणि नेहमीच वादात अडकणारे माजी भगत सिंह कोश्यारीनंतर आता राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस हे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. (Mumbai News ) ‘जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला’, असं वक्तव्य बैस यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे, (Now the new governor is in controversy! ‘Janjira Fort was won by Bajirao Peshwa’, Governor Ramesh Bais’ statement amid controversy)
३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त मंगळवारी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बैस यांनी जंजिरा किल्ल्याचा चुकीचा इतिहास सांगितला.
भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला. तसेच महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ते वादात सापडले होते. (Mumbai News ) आता राज्यपाल रमेश बैस देखील जंजिरा किल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.
सांगितला चुकीचा इतिहास…
जंजिरा किल्ला बाजीराव पेशव्यांनीच जिंकला. बाजीराव पेशव्यांना विसरून चालणार नाही, जंजिरा किल्ल्याला त्यांनीच मुक्त केल, असं विधान रमेश बैस यांनी केलं आहे. (Mumbai News ) राज्यपालांच्या चुकीच्या वक्तव्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजीराव पेशव्यांबाबत राज्यपालांना चुकीची माहिती कुणी दिली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.