Tamhini Ghat Accident: रायगडमध्ये भीषण (Raigad Accident ) अपघाताची घटना घडली आहे. पुणे-माणगाव मार्गावर एक थार गाडी ताम्हिणी घाटात 500 फुट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत असून बचाव पथकाद्वारे बचावकार्य सुरु आहे. (tamhini ghat accident latest news)

हेही वाचा: पार्किंगची चिंता सोडा! PMC ची अधिकृत ‘पे अँड पार्क’ सेवा सुरु.., लोकेशन, शुल्क किती? पाहा..
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन तरुण होते. काहीजण गाडीत असण्याची शक्यता आहे. तीव्र वळणावर चालकाचे नियत्रंण सुटून थार जीप 500 फूट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्याच काम बचाव पथकामार्फत सुरु आहे. हा अपघात कसा झाला याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: पुणेकरांना मोठा दिलासा! खडकी स्थानकाचा विकास गतीने, थेट दिल्ली गाठणं होणार सोपं







