Pune Railway Update: पुणेकरांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे (Pune Railway Station) रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने खडकी (Khadaki Railway Station) स्थानकाच्या विस्तार आणि सर्वांगीण विकासाची कामे वेगाने हाती घेतली आहेत. कामांना गती मिळाल्याने लवकरच प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (Pune Railway Update)

मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांश कामे आता अंतिम टप्प्यात असून पुढील 1 ते 2 महिन्यांत म्हणजे येणाऱ्या जानेवारी पर्यंत खडकीहून थेट दिल्ली, बेंगळुरू आणि इतर काही प्रमुख शहरांकडे गाड्या सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकी स्थानकातून नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर दिल्ली आणि बेंगळुरूसाठी खडकी येथून थेट गाड्यांची सुविधा सुरू होणार आहे.

सध्या पुण्यातील प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी प्रामुख्याने झेलम एक्स्प्रेसचा आधार घ्यावा लागतो, तर बेंगळुरूसाठी उद्यान, कोयंबतूर आणि संपर्क क्रांती या काही गाड्या उपलब्ध आहेत. मात्र या गाड्यांमुळे थेट आणि वेगवान पर्याय मिळत नसल्याने प्रवाशांना गैरसोय भासत होती.
खडकी स्थानकातून स्वतंत्र गाड्या सुरू झाल्यास पुणे–दिल्ली आणि पुणे–बेंगळुरू या मार्गांवरील प्रवाशांचा वेळ वाचणार असून गर्दीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. रेल्वे विभागाच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे पुणेकरांना अधिक वेगवान व सोयीस्कर रेल्वे प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा– पुणेकरांना आज दिलासा: कडक थंडी गेली, आता ‘सनी डे’! कसे असेल आजचे तापमान?






