Pune News : (pay and park) गेली सात वर्षे अडकून पडलेली पुण्यातील ‘पे अँड पार्क योजना’ (pay and park) अखेर प्रत्यक्षात राबवण्याच्या तयारीत आली आहे. महापालिकेनं पहिल्या टप्प्यात सहा रस्त्यांसाठी निविदा जाहीर केली असून, या योजनेमुळे शहरातील अव्यवस्थित पार्किंग आणि वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं योजनेला पूर्वीच मंजुरी दिली होती. मात्र विरोध, आंदोलनं आणि राजकीय मतभेदांमुळे योजना वर्षानुवर्षे थांबली होती. वाढती वाहनसंख्या व वाढत चाललेली कोंडी पाहता प्रशासनानं आता ही योजना गतीनं राबवण्याचा निर्णय घेतला आहे. Pune News

पहिल्या टप्प्यातील सहा रस्त्यांची निवड (pay and park location)
प्रायोगिक तत्त्वावर खालील रस्ते निवडले आहेत:
- जंगली महाराज रोड
- फर्ग्युसन रोड
- लक्ष्मी रोड
- बिबवेवाडी
- बालेवाडी हाय-स्ट्रीट
- विमाननगर परिसर
ठेकेदार निवडण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, निवडलेल्या ठेकेदाराला तीन वर्षांचा करार दिला जाणार आहे.

पार्किंग शुल्क किती?
दुचाकी : प्रतितास 4 रुपये

चारचाकी : प्रतितास 20 रुपये
हे दर विद्यमान मक्ता पद्धतीपेक्षा जास्त असले तरी रस्त्यावर मिळणारी सोय, देखरेख आणि नियंत्रण यामुळे हे शुल्क वाजवी असल्याचं प्रशासनाचं मत आहे.
प्रत्येक रस्त्यावरील पार्किंग क्षमता
बालेवाडी हाय-स्ट्रीट : 199 चारचाकी, 888 दुचाकी
बिबवेवाडी : 75 चारचाकी, 920 दुचाकी
जंगली महाराज रोड : 51 चारचाकी, 856 दुचाकी
फर्ग्युसन रोड : 108 चारचाकी, 804 दुचाकी
विमाननगर : 185 चारचाकी, 490 दुचाकी
लक्ष्मी रोड : 60 चारचाकी, 238 दुचाकी
या व्यवस्थेमुळे रस्त्यांवरील अनियमित पार्किंग आटोक्यात येईल, अशी आशा महापालिकेनं व्यक्त केली आहे.
योजना यशस्वी ठरल्यास पुढील विस्तार
पे अँड पार्क (pay and park) च्या पहिल्या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास, शहरातील आणखी रस्त्यांवर ही पद्धत लागू करण्याचा विचार आहे. आता ही योजना प्रत्यक्षात कशी अंमलात येते आणि नागरिकांची प्रतिक्रिया काय असते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.







