Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 October 2026, 11:28

दौंड : बहिणीला पुण्याला कॉलेजला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सोडायला निघालेल्या भावाच्या दुचाकीला भरधाव ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून धडक दिल्याची घटना दौंडमधील धुमाळ वस्ती येथील फॉरेस्ट रस्त्याजवळ घडली. या अपघातात भाऊ किशोर आवटे आणि त्याची बहीण गायत्री हे दोघे किरकोळ जखमी झाले असून, दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक विलास रामदास मोरे याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर गौतम आवटे (वय 24, रा. नानवीन, ता. दौंड) हा 26 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आपली बहीण गायत्री हिला पुण्याला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सोडण्याकरिता दुचाकीवरून निघाला होता. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धुमाळ वस्ती येथील फॉरेस्ट रस्त्याजवळ आले असता, समोरून येणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

तक्रारीनुसार, ट्रॅक्टर भरधाव वेगात येत होता. किशोरने हॉर्न वाजवून इशारा देण्याचा प्रयत्न केला; मात्र ट्रॅक्टरवरील टेपरेकॉर्डरवर मोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याने चालकाचे लक्ष गेले नसल्याचा आरोप आहे. ट्रॅक्टरच्या धडकेमुळे किशोर आणि गायत्री दुचाकीसह रस्त्यावर पडले.

या अपघातात किशोरच्या पायाला मुकामार लागला असून, उजव्या हाताच्या कोपराला आणि डाव्या डोळ्याच्या वरच्या भागाला खरचटले आहे. गायत्रीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यालाही खरचटले. घटनेची माहिती मिळताच किशोरच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना खासगी वाहनातून दौंड येथील पाटील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

या प्रकरणी ट्रॅक्टरचालक विलास रामदास मोरे (रा. कासारी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 11:42

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44
Next Post

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp