Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 27 October 2026, 10:44

उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत चायनीज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीच्या अड्ड्याचा उरुळी कांचन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘हॉटेल गुरू चायनीज पॉईंट’च्या गाळ्यात विनापरवाना व बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या चालकावर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. ही कारवाई सोमवारी (ता. 26) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

हुसेन गफ्फुर शेख, (वय 42, सध्या रा. उरुळी कांचन, हॉटेल गुरू चायनिज पाँईट ता. हवेली जि पुणे मुळ रा. बारंगुळे प्लॉट गाडेगाव रोड, ता. बार्शी जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल आव्हाळे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 26) रात्री साडे आठवाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील सोलापूर लेनवर असलेल्या ‘हॉटेल गुरू चायनीज पॉईंट’ च्या गाळ्यात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अंमलदार राहुल आव्हाळे व त्यांच्या पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी चायनीज सेंटरच्या गाड्याची झाडाझडती घेतली असता, आरोपी हुसेन शेख हा आपल्या ओळखीच्या ग्राहकांना बेकायदेशीरपणे दारू विकताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून देशी दारू ‘टॅगो पंच’, विदेशी दारू ‘इम्पेरिअल ब्लू’ असा 1 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी हुसेन शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा (गु.र.नं. २८७/२०२६) नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44

दिवाळीसाठी पुणेकरांना एसटी महामंडळाची मोठी भेट! गावी जाण्यासाठी 1200 जादा बस धावणार; कुठून सुटणार, कोणत्या मार्गांवर सेवा?

Tuesday, 27 October 2026, 10:36

पुणे–सातारा महामार्गावर सशस्त्र नाकाबंदी; पानवडी हत्याकांडातील संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचा थरार

Tuesday, 27 October 2026, 10:35
Next Post

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp