Pune News : शहरात ससून रुग्णालयाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांच्या मामे सासऱ्यांना रुग्णालयातून (Pune Sassoon Hospital) बेपत्ता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्या बाबत रुग्णालय प्रशासन कोणतीही माहिती देत नसल्याचा दावा तुळजापूरकर यांनी केला आहे. (pune latest news)

आरोप काय?
प्रकाश पुरोहित असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, त्यांना 23 सप्टेंबर 2024 रोजी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून त्यांची कोणतीही प्रकृतीविषयक माहिती दिली गेली नसल्याचा आरोप तुळजापूरकर यांनी केला आहे. पुरोहित उपचार घेत आहेत की त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतसुद्धा नातेवाईकांना कोणतीही खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा: लग्नानंतर एक्स-गर्लफ्रेंडची जबरदस्ती किस…; संतापलेल्या तरुणीने असं काही केलं की…
या संदर्भात तुळजापूरकर यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. ते लवकरच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेणार आहेत. याच मुद्द्यावर त्यांनी शासनाला पत्र देखील पाठवले आहे.
तुळजापूरकर यांनी पत्रात काय म्हटलंय?
पाठवलेल्या पत्रात तुळजापूरकर यांनी म्हटले आहे की,, “माझे मामे सासरे प्रकाश पुरोहित यांना 23 सप्टेंबर 2024 रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून आम्हाला काहीही माहिती दिली गेली नाही. ते जिवंत आहेत की मृत ही मूलभूत माहिती देखील नातेवाईक म्हणून आम्हाला दिलेली नाही. हा प्रकार अत्यंत खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तुळजापूरकर पुढे म्हणतात, “गेल्या दोन महिन्यांपासून मी सतत पाठपुरावा करत आहे. एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे मला पाठवलं जात आहे. हेलपाटे मारून मी वैतागलोय. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल तर सर्व सामान्य जनतेसोबत काय होत असेल. हा सर्व प्रकार मी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा संचालक वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन माधुरी मिसाळ यांच्यादेखील निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”
हेही वाचा: मोठी बातमी..! आरक्षण मर्यादेचं उल्लंघन.., महापालिका निवडणुकीत खोडा? सुप्रीम कोर्ट म्हणालं…







