Ladaki Bahin Yojna : महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. राज्यात ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये सरकारकडून दिले जातात. ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून तब्बल २ कोटींपेक्षा जास्त महिलांना याचा फायदा मिळालाय. दर महिन्याला थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. Ladaki Bahin Yojna

पण योजनेत काही गडबड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे सरकारने पडताळणी सुरू केली. त्याच वेळी पात्र महिलांना ई-केवायसी करायला सांगितलं. आधी 18 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिली होती, पण खूप बहिणींचं ई-केवायसी बाकी असल्याने ही मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवून देण्यात आली आहे. Ladaki Bahin Yojna
२० दिवस उलटले नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?
नोव्हेंबर महिना सुरू होऊन २० दिवस उलटले, पण राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे. Ladaki Bahin Yojna
यावर सूत्रांकडून मिळालेली अपडेट अशी की नोव्हेंबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. Ladaki Bahin Yojna
निवडणुका डोक्यावर आल्यामुळे आचारसंहितेमुळे हप्ता थांबतो का, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. पण आता मिळालेल्या माहितीप्रमाणे निवडणुकीपूर्वीच पैसे खात्यात जमा करण्याचा विचार सुरू आहे. Ladaki Bahin Yojna मात्र, पैसे नेमके कोणत्या दिवशी येणार, याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे सगळ्याच लाडक्या बहिणींचं लक्ष आता त्या तारखेवर खिळलंय.
ई-केवायसीची शेवटची संधी Ladaki Bahin Yojna
योजनेचा लाभ पुढेही मिळावा म्हणून ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. Ladaki Bahin Yojna नाहीतर हप्ता मिळणं थांबू शकतं. म्हणूनच सरकारनं मोठी सवलत देत मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.






