पुणे : हडपसरमधील वैद्यूवाडी परिसरात रविवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. दहावीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित विद्यार्थिनी हडपसर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होती. तिची दहावीची परीक्षा जवळ येत असल्याने अभ्यासाचा ताण असल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर अभ्यास आणि निकालाबाबत ताण येऊ शकतो. अशा वेळी पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.







