Pune Accident News: चाकण शिक्रापूर रोडवर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात (Accident) घडला. या अपघात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी सुमारे 11.15 च्या सुमारास साबळेवाडी परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. (Pune Accident News)

हेही वाचा- Pune Accident News: पुण्यात दुचाकीची कंटेनरला धडक, अपघातात 11 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुबाई पांडुरंग शेळके यांनी चाकणच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट मागितली होती. एका अज्ञात दुचाकी चालकाने लिफ्ट दिल्यानंतर चाकणकडे जात असताना मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दोघे ही जमीनवर कोसळले. दोघांना गंभीर दुखापत झाले होते. परंतु सिंधुबाई याचा जागीच मृत्यू झाला. चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यवर सध्दा उपचार सुरु आहे अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबळेवाडीजवळ मागून येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. ही धडक भंयकर होती. दोघे ही या धडकेत गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून टेम्पो चालक फरार झाला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहे.
चाकण पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत 281 (अचानक वाहन चालवणे), 106 (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 125 (मानवी जीवनाला धोका निर्माण करणे) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
अपघातानंतर टेम्पोचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून स्थानिक नागरिकांचीही चौकशी सुरू आहे.
हेही वाचा- Pune Railway Update: पुणेकरांना मोठा दिलासा! खडकी स्थानकाचा विकास गतीने, थेट दिल्ली गाठणं होणार सोपं






