Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sangali news : दुर्दैवी..! मराठी विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी घेत आत्महत्या; शिक्षिकेने…, काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 November 2025, 13:16
sangali news

photo- ppn

Sangali news : दिल्लीत शिक्षणासाठी आलेल्या दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.  शौर्य प्रदीप पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत तो दहावीत शिकत होता. या विद्यार्थ्याने शाळेतील सततच्या छळाला कंटाळून मंगळवारी मेट्रो स्टेशनवरून उडी मारत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि काही शिक्षकांकडून होणाऱ्या त्रासामुळे शौर्य मानसिक तणावाखाली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शौर्यची सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली आहे. Sangali news

 

शौर्य पाटील हा मूळचा सांगलीचा

शौर्य पाटील हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा. कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त दिल्लीतील राजीव नगर भागात राहतात. घटना घडलेल्या दिवशी शौर्यचे वडील प्रदीप पाटील हे कोल्हापूरला आजीच्या उपचारांसाठी गेले होते. सकाळी मुलाला नेहमीप्रमाणे ड्रायव्हर शाळेत सोडून आला, मात्र दुपारी तो परतला नाही. याचदरम्यान त्याच्या मित्राने घरच्यांना फोन करून सांगितले की, शौर्य मेट्रो स्टेशनकडे गेला आहे. थोड्याच वेळात आलेल्या फोनवरून कुटुंबाला धक्का बसला शौर्य पुलावरून पडल्याची माहिती देत त्याला रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. Sangali news

शिक्षकांच्या धमक्या

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर पोलिसांनी कुटुंबाला कळवले की, शौर्यजवळ सुसाईड नोट सापडली आहे. तेव्हा ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. शौर्यच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सात–आठ महिन्यांपासून तो शिक्षकांच्या त्रासाबद्दल तक्रार करत होता. चारच दिवसांपूर्वी एका शिक्षकाने त्याला “दाखला काढून हातात देईल” अशी धमकीही दिली होती. आत्महत्येच्या दिवशी शाळेतील एका कार्यक्रमात पाय घसरून पडल्यावर शिक्षकांनी त्याला मुद्दाम पडलो असा आरोप करून सर्वांसमोर अपमानित केले. ‘तुझा ड्रामा बंद कर’ अशी ताशेरेबाजीही करण्यात आली. मुख्याध्यापिकांपुढेच हा अपमान झाला, तरी त्यांनीही कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

सुसाईड नोट मिळाली

शौर्यने सुसाईड नोटमध्ये इतर विद्यार्थ्यांवर असा छळ होऊ नये, हीच माझी शेवटची इच्छा असल्याचे लिहिले आहे. हा अंतर्मुख करणारा संदेश आता अनेक प्रश्न निर्माण करतो. शौर्यचे वडील आणि नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “आमचा मुलगा गमावला; पण दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर हा काळा दिवस येऊ नये,” अशी शोकांतिका शौर्यच्या काकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणामुळे शाळांमधील विद्यार्थी-शिक्षक वर्तन, मानसिक आरोग्य आणि प्रशासकीय जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत कारवाई होईपर्यंत न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52
Next Post
Eknath Shinde Meets Amit Shah: “Entry for workers from each other's parties..”; Amit Shah's meeting and Shinde's displeasure; Bawankule said...

Eknath Shinde Meets Amit Shah: “एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश.."; अमित शाहांची भेट अन् शिंदेंची नाराजी; बावनकुळे म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.