Gautami Patil | तासगाव, (सांगली) : नृत्यांगना गौतमी पाटीलची सध्या राज्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रम म्हटल्यावर गर्दी होणार हे ठरलेलंच असतं. पंचक्रोशीत गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम असला की आसपासच्या गावातील प्रेक्षक कार्यक्रमासाठी गर्दी करणार हेही ठरलेलंच.
अशातच गावात गौतमी पाटील येणार आहे आणि दोन दिवसांची सुट्टी द्या, असा रजेचा अर्ज एका एसटी चालकाचा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगलीच्या तासगाव डेपोतला सदर चालक असल्याचे समोर आले आहे.
या अर्जामध्ये एसटी चालकाने गावात गौतमी पाटील येणार म्हणून दोन दिवसांची रजा मागितली आहे. 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मिळावी असं रजा अर्जात नमूद केलंय. पण ही सुट्टी गावात गौतमी पाटील येणार आहे म्हणून मिळावी असं मजकूर देखील या रजेच्या अर्जावर लिहिण्यात आले आहे.
गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची सुट्टी मिळावी, असा हा अर्ज असल्याने सांगलीच्या एसटी प्रशासनापासून सगळीकडे एकच उडाली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अर्जावर नेटकऱ्याकडून जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज लिहिण्यात आला आहे. तो बोगस अर्ज आहे की खरा हे अद्याप समजू शकले नाही.
तासगाव एसटी आगारामध्ये संबंधित नावाचा चालक कार्यरत आहे,मात्र त्या चालकाकडून अशा प्रकारे अद्यापतरी कोणत्याही रजेचा अर्ज हा दाखल केला गेला नाही,असं तासगाव एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज व्हायरल होत आहे त्या चालकाची या अर्जाबाबत नेमकी प्रतिक्रिया काय हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे कोणीतरी खोडसाळ पणाने हा अर्ज लिहून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची शक्यता आहे.
दरम्यान सदरच्या अर्जाबाबतीत संबंधित चालकाशी संपर्क केल्यावर याबाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकाने कोणत्याही प्रकारचा असा अर्ज लिहिला नाही किंवा तो एसटी प्रशासनाकडे सादर देखील केला नाही. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणाने हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आलं आहे.
सदरचा अर्ज पूर्ण खोटा असून त्यावरील त्या चालकाची सही देखील बोगस आहे आणि तासगावच्या एसटी विभागाकडे असा कोणत्याही प्रकारचा रजेचा संबंधित चालकाचा अर्ज देखील आला नसल्याचा समोर आलं आहे. मात्र सदरचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Gautami Patil | गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरण ; एकाला जामीन मंजूर