Big News : पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. तुमच्या संवेदना मराठा समाजबांधवांनादेखील माहिती आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांच्यावर घणाघात केला.
आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टात ते चॅलेंज झाले. पण ते टिकवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केले. सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्री कोण होते? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? त्यांनी हे आरक्षण टिकवले नाही.(Big News) मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, माता-भगिणींचा अपमान करणारे कोण होते, हे देखील मराठा समाजाला माहिती आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
आम्ही आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. जस्टीस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला इम्पेरिकल डेटा युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. (Big News) या सर्वाला कारणीभूत असणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार उरलेला नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही हे न्यायालयाने म्हटले, त्यावेळी मराठा समाज मागास कसा आहे याचे सर्व पुरावे तुम्ही न्यायालयात देणे गरजेचे होते. (Big News) या सर्व गोष्टी मराठा समाजाला माहिती आहेत. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आमचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे तुमची आगपाखड होत आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक