Big News : मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण, कॅण्डल मार्च काढण्यात येत आहे. काही भागात आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली असून, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालय परिसरात आक्रोश करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. या वेळी सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
सत्तेत असलेल्या आमदारांनाही या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास नाही
जालना येथे अमानुष पद्धतीने महिलांवर, मुलांवर लाठीचार्ज केला जात आहे. याच गृहमंत्रालयाने त्यानंतर ज्या पद्धतीने कोयता गॅंग असेल आणि ज्या पद्धतीने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच; पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (Big News ) सत्तेत असलेल्या आमदारांनाही या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा, तातडीने अधिवेशन घ्या, अशी मागणी मी सातत्याने करत आहे. तुम्ही मागचे सर्व रेकॉर्ड काढून बघा. सत्ताधारी खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीने सगळ्यात जास्त वेळा (Big News ) हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे? देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या घराबाहेर येऊन सांगितले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. काय झाले पुढे? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, मंत्रालय परिसरात सत्ताधारी आमदारांनीही सहभाग घेतला आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत कामकाज चालू न देण्याचा इशाराही सर्व आमदारांनी या वेळी दिला. (Big News ) आंदोलनकर्त्या आमदारांना पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Big News : मंत्रालयाबाहेर आंदोलन करणारे आमदार पोलिसांच्या ताब्यात
Big News : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; अधिवेशन बोलवण्याची मागणी
Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात