Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या… संतप्त सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 November 2023, 15:00

Big News  : मुंबई : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण, कॅण्डल मार्च काढण्यात येत आहे. काही भागात आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. आरक्षणासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली असून, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालय परिसरात आक्रोश करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. या वेळी सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

सत्तेत असलेल्या आमदारांनाही या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास नाही

जालना येथे अमानुष पद्धतीने महिलांवर, मुलांवर लाठीचार्ज केला जात आहे. याच गृहमंत्रालयाने त्यानंतर ज्या पद्धतीने कोयता गॅंग असेल आणि ज्या पद्धतीने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय असतील, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच; पण त्याच्यात गृहमंत्रालयाचं जास्त आहे, त्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. (Big News ) सत्तेत असलेल्या आमदारांनाही या ट्रिपल इंजिन खोके सरकारवर विश्वास नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

 

सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवा, तातडीने अधिवेशन घ्या, अशी मागणी मी सातत्याने करत आहे. तुम्ही मागचे सर्व रेकॉर्ड काढून बघा. सत्ताधारी खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीने सगळ्यात जास्त वेळा (Big News ) हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे? देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या घराबाहेर येऊन सांगितले होते की, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. काय झाले पुढे? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मंत्रालय परिसरात सत्ताधारी आमदारांनीही सहभाग घेतला आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत कामकाज चालू न देण्याचा इशाराही सर्व आमदारांनी या वेळी दिला. (Big News ) आंदोलनकर्त्या आमदारांना पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Big News : मंत्रालयाबाहेर आंदोलन करणारे आमदार पोलिसांच्या ताब्यात

Big News : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांचा मंत्रालयासमोर आक्रोश; अधिवेशन बोलवण्याची मागणी

Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post

Pimpri News : भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली : विनय पत्राळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.