Big News : जालना : मराठा आरक्षण २४ऑक्टोबरपर्यंत जाहीर न केल्यास २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या उपोषण आंदोलन कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नाही. असेही त्यांनी सांगितले आहे.
मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आज रविवारी (ता.२२) मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी वरील घोषणा त्यांनी केली आहे.आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले. (Big News) तसेच शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच मंत्री, आमदार, खासदार, प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सर्कल मधील सर्व गावाच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. (Big News) पुढे २८ ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. जनतेच्या मुळावर पाय देणे याला विकास म्हणत नाही, आमच्या मुंडक्यावर पाय देऊन कोणाला मोठं करायचे आहे असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी या वेळी केले. तूर्तास आंदोलनाची ही दिशा असून आंदोलन सुरू झाल्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा सांगितली जाईल.(Big News) हे आंदोलन, साखळी उपोषण आणि त्याशिवाय २५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुढील आंदोलन सरकारला झेपणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : एका आमदाराला १६ लाखांचा हप्ता, असे सहा आमदार…. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप!
Big News : ललित नव्हे, भूषण पाटील ससूनमधील ड्रग्ज रॅकेटचा खरा सूत्रधार; तपासात धक्कादायक माहिती उघड!