Big News : पुणे : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यावर प्रतिक्रीया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा बांधवांना सरसकट प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यासाठी उद्या मंत्रिमंडळात बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलवा. एकाला प्रमाणपत्र द्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही ही भूमिका असू नये. सरसकट प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मी आंदोलन थांबवणार नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
सरसकट प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही
मनोज जरांगे पाटील यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनद्वारे आरक्षणाबाबतच्या निर्णयाची कल्पना दिली. याबाबत सरकारने समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला आहे. (Big News) उद्या (ता. ३१) सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक बोलावली आहे. पुरावे सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र दिले, तरी हे आंदोलन अधिक तीव्र होणार आहे, असे जरांगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की थोडा वेळ आम्हाला द्या. त्यावर विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही थोडा म्हणजे किती वेळ द्यायचा? आम्ही ४० वर्षे थांबलो आहोत. (Big News) थोडा वेळ म्हणजे नेमका किती वेळ द्यायचा? त्यामुळे आता मुदतवाढ देण्यास आमचा विरोध आहे,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; जळगावातील चोरट्यांना पुण्यात सापळा रचून अटक
Pune News : सासूने नकटी संबोधले; सुनेने सासूच्या हातावर सुरीने सपासप वार केले
Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..