दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका विकृत तरुणाने श्वानावर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता राजधानी दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील कैलाशनगर भागात अनेक कुत्र्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमाला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजधानी दिल्लीत शाहदरा येथील कैलाशनगर येथून एका व्यक्तीला कुत्र्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे.एका प्राणी स्वयंसेवी संस्थेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी नौशादला दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचाराचा केल्याचा आरोप केला आहे. आरोपीचे नाव नौशाद असे आहे.तो बिहारमधील सुपौल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्याव्यतिरिक्त विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नराधमाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, असे दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. व्हिडिओमध्ये त्या माणसाला लोक मारहाण करताना आणि त्याने किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे, असे विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्राणी प्रेमीने सोशल मिडिया एक्सवरती शेअर केला आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओही ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने किमान 12-13 मादी कुत्र्यांवरअनैसर्गिक अत्याचाराचा आरोप एनजीओने केला आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.