मुंबई: विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती गवई 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होईपर्यंत म्हणजे सुमारे सहा महिने त्यांचा कार्यकाळ राहील. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ भूषण गवई हे 14 मे रोजी 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश म्हणून शपथ देतील. 24 मे 2019 रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. आता ते 14 मे 2025 रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडील दिवंगत रामकृष्ण गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, खासदार आणि बिहार, सिक्कीम आणि केरळ राज्यांचे माजी राज्यपाल होते. जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी त्यांनी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाईबद्दल त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.







