पुणे : आगामी भारत बांगलादेश मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यात वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि शाहबाझ अहमद यांचा समावेश करण्यात आला आहे. या मालिकेत भारत तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
या मालिकेसाठी रवींद्र जडेजाला स्थान देण्यात आले होते, मात्र जडेजा या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून याचबरोबरीने यश दयालला देखील वगळण्यात आले आहे.
चार दिवसीय सामन्यासाठी अभिमन्यू ईश्वराला भारतीय अ संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून या सांगतात युवा खेळाडूंचा भरणा आहे. आयपीएलमध्ये खेळणार यशस्वी जैस्वालला देखील या संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबईचा सर्फराज खानसह अनुभवी चेतेश्वर पुजारा व उमेश यादव देखील या संघात खेळणार आहेत.
बांगलादेश दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) , इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.
पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतिथ सेठ
दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित शेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, केएस भरत (यष्टीरक्षक).