चेन्नई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. यापूर्वी बेंगळुरूने 2008 मध्ये चेन्नईचा त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदा आणि शेवटचा पराभव केला होता. IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. चेन्नईकडून शिवम दुबेने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 38* (28 चेंडू) सर्वाधिक धावा केल्या, तर गोलंदाजीत मुस्तफिझूर रहमानने 4 बळी घेतले. जडेजाने दुबेला चांगली साथ दिली.
चेपॉकमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने सुरुवातीपासून शेवटपर्यंत बंगळुरूवर वर्चस्व राखले. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबीने 20 षटकात 173/6 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजांच्या चांगलेच जेरीस आणले, परंतु शेवटी दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी सहाव्या विकेटसाठी 95 (50 चेंडू) धावांची भागीदारी केली. ज्यामुळे संघाला चांगली धावसंख्या उभारता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 18.4 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला.
174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 38 (24 चेंडू) धावांची भागीदारी केली. संघाला पहिला धक्का चौथ्या षटकात कर्णधार गायकवाडच्या रूपाने बसला, ज्याने 3 चौकार मारून 15 धावा (15 चेंडू) केल्या. त्यानंतर रचिनने रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 33 धावांची (18 चेंडू) भागीदारी केली. रहाणे 2 षटकारांच्या मदतीने 27 धावा (19 चेंडू) करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
यानंतर 13व्या षटकात 2 षटकारांच्या मदतीने 22 धावा (18 चेंडू) करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या डॅरिल मिशेलच्या रूपाने संघाने चौथी विकेट गमावली. यानंतर चेन्नईने एकही विकेट गमावली नाही. रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी संघाला मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 66* (37 चेंडू) धावांची भागीदारी केली. यादरम्यान शिवम दुबेने 38* आणि जडेजाने 25* (17 चेंडू) धावा केल्या.
या सामन्यात आरसीबीची गोलंदाजी अत्यंत खराब होती. मात्र, ग्रीनने 3 षटकांत 27 धावांत 2 बळी घेतले. याशिवाय यश दयाल आणि कर्ण शर्मा यांना 1-1 विकेट मिळाली. दयालने 3 षटकांत 28 धावा आणि कर्ण शर्माने 2 षटकांत 24 धावा दिल्या.