वाघोली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वेगवेगळ्या भागातून गुन्हेगाराच्या घटना उघडकीस येत असताना आता पुणे शहराच्या उपनगर असलेल्या वाघोली परिसरात गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडत असून, यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली आहे. आता वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रोड ,ढुबेनगर, गणेश नगर परिसरातील तब्बल वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करण्यास आली आहे.टोळक्यानीं कार बसेसची तोडफोड केली. तोडफोडीनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे
वाघोली परिसरात २०ते २५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे वाघोलीत गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसत आहे.पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी सांगितली.