पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये रस्त्यावर बर्थडे सेलिब्रेशन करण्याची आणि रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांचे बार लावण्याची जणू प्रथाच आहे. अशातच आता सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.यामध्ये पिंपरी चिंचवड मधील एका पोलिसांने अनेक नियम खुंटीवर टांगत बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केलं आहे. रात्री बाराच्या ठोक्याला गुन्हेगारांकडून पोलिसाच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात बाराच्या ठोक्याला पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते विशेष म्हणजे उपस्थित असलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या वाढदिवसाचे आयोजन केल्याची माहिती समोर आली आहे. या चार पैकी दोघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे आणि दोघांवर हाणामारीचे तीन गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस खात्याकडून प्राप्त झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई यांच्या जंगी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनने अख्या पोलीस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त चौबे साहेब या प्रकरणी काही कठोर करावी करतात का? याकडे शहर वासियांचे लक्ष लागल आहे.
भरस्त्यात बारा वाजता पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांच्यासह मित्रमंडळी रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून वाढदिवसाच्या सेलिब्रेशन करू लागले. दोघांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि बॉम्ब फुटू लागले ही आतिशबाजी बराच वेळ सुरू होती,या सगळ्या प्रकाराचा ड्रोन द्वारे चित्रीकरण चित्रीकरण करण्यात आलं. यात गुन्हेगारांसोबत पोलिसांचा जल्लोष पाहता सर्वत्र उलट सुलट चर्चा आता रंगू लागली आहे. आता यावर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे