Yavat News यवत, (पुणे) : गावातील विकासकामे करताना निधीचा हिशोब व्यवस्थित न देणे, कर्तव्यात कसूर करणे व व्यवहारात अपहार केल्याप्रकरणी यवत (ता. दौंड) (Yavat News) येथील तत्कालीन सरपंचांना ४ लाख ८८ हजार ५४४ रुपये व्याजासह सात दिवसात भरण्याचे आदेश दौंडचे गटविकास अधिकारी येळे यांनी दिले आहेत.
यवतचे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकाण यांच्याविरोधात विविध आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या आरोपांची चौकशी करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने केली होती. या आदेशानुसार, केकाण यांची विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर केकाण यांच्यावर आरोप सिद्ध झाले होते.
ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल १० लाख ८५ हजार ८७६ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर…
यवत ग्रामपंचायतीच्या निधीतून तब्बल १० लाख ८५ हजार ८७६ रुपयांचा अपहार झाल्याचे या चौकशीतून समोर आले होते. त्यामुळे यानंतर त्यांच्यावर सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली होती.
गावातील विकासकामे करताना विहित पद्धतीचा अवलंब न करणे, निधीचा हिशोब व्यवस्थित न देणे, कर्तव्यात कसूर करणे यासह आदी आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन माजी सरपंचांनाही या अपहारातील ४ लाख ८८ हजार ५४४ रुपयांची रक्कम व्याजासह भरण्याचे आदेश देण्यात आले असून ही रक्कम सात दिवसांत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, एकूण अपहारीत रक्कम १५ लाख ७४ हजार ४२० रुपये असुन तत्कालीन ग्रामविकास अधिकारी केकाण यांच्याकडे १० लाख ८७ हजार ८७६ रुपये एवढी रक्कम निश्चित करुन वसुलीची कारवाई सुरु केली आहे. उर्वरीत अपहारीत रक्कम व व्याजाची रक्कम माजी सरपंचांवर निश्चित केली असुन ग्रामपंचायत कार्यालय यवत या ठिकाणी सदर रक्कम पत्र मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत जमा करावी अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश निवेदनात देण्यात आले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
MSRTC : शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचे स्थलांतर होणार
Jejuri News : जेजुरी गडासाठी १०९ कोटींचा निधी मंजूर
Satara News : सातारा औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्थीने तूर्तास संप मागे : भगवानराव वैराट