उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील एका 42 वर्षीय व्यक्तीने अज्ञात कारणावरून राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. 11) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बोधेकाकडे वस्ती परिसरात हि घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
प्रमोद बळीराम राठोड (वय – 42, रा. बोधेकाकडे वस्ती कोरेगाव मूळ ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रंजना प्रमोद राठोड (वय – 33, सध्या रा. बोधेकाकडे वस्ती कोरेगावमूळ ता. हवेली मूळ रा. मुंगशी ता. पुसद जि. यवतमाळ) यांनी याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद व रंजना प्रमोद राठोड आपल्या पाच मुलांसोबत कोरेगावमूळ परिसरातील बोधेकाकडे वस्ती येथे राहतात. रंजना राठोड या शेत मजुरी करून कुटुंबाची उपजीवीका करतात. मंगळवारी (ता. 11) सकाळी घरातील स्वयंपाकाचा गॅसची शेगडी खराब झाल्याने रंजना राठोड या त्यांचा भाउ नेमचंद येदुसिंग जाधव याला घेवून टुव्हीलर गाडीवर उरुळी कांचन येथे गेल्या होत्या.
गॅसची शेगडी दुरूस्त करून घरी आल्या. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता पती प्रमोद राठोड यांनी घरातील लोखंडी अँगलला नायलानच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पत्नी यांनी तत्काळ त्यांच्या भावाला बोलावून सदर घटनेची माहीती दिली. पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी सदर ठिकाणी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. प्रमोद बळीराम राठोड यांनी आत्महत्या का? केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहे.