उरुळी कांचन (पुणे) : फोनवरून कोणाशी बोलत आहात मला मारण्याचे प्लॅनिंग चालू आहे काय, दुसऱ्याने मारण्यापेक्षा तूच मला मार असे म्हणताच चिडलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. 05) रात्री 8 व गुरुवारी (ता. 06) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौतम केराप्पा भोसले (वय 45, रा. ड्रीम निवारा कोरेगाव मूळ ता. हवेली) असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे. तर मनीषा गौतम भोसले (वय 37, रा. सदर) असे पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम भोसले व मनीषा भोसले हे दोघे पती-पत्नी आहेत. कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. 05) रात्री 8 व गुरुवारी (ता. 06) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गौतम भोसले हे घरी होते. यावेळी भोसले यांचे एका महिलेबरोबर अफेयर असल्याने तिचे बरोबर फोनवर बोलत होते.
यावेळी मनीषा भोसले यांनी कोणाशी बोलत आहात मला मारण्याचे प्लॅनिंग चालू आहे काय? असे म्हणाल्या. त्यावेळी पती भोसले हे होय असे म्हणाले, त्यावेळी मनीषा या त्यांना म्हणाल्या की, दुसऱ्याने मारण्यापेक्षा तूच मला मार, असे म्हणाल्या व त्यांचा हात पकडला. यावेळी गौतम भोसले यांनी मनीषा भोसले यांना हात पकडल्याच्या कारणावरून हाताने, लाथा, बुक्क्याने तोंडावर व पाठीत मारहाण केली. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या मारहाणीत मनीषा भोसले यांचा उजवा हात मनगटाजवळ पिरगळून शिवीगाळ, दमदाटी करून दुखापत केली आहे. याप्रकरणी मनीषा भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती गौतम भोसले विरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.