व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, May 28, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टाळ-मृदंगाचा ताल अन् अखंड हरिनामाचा गजर; डोर्लेवाडीत लाखो भाविकांच्या साथीने संत तुकाराम बीजेचा सोहळा संपन्न…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 28 March 2024, 11:05

डोर्लेवाडी (पुणे) : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा ३७६ वा बीज सोहळा बुधवारी (ता. २७) मोठ्या आनंदात प्रती देहू समजल्या जाणाऱ्या डोर्लेवाडीत (ता. बारामती) पार पडला. तुकोबांच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने वारकरी डोर्लेवाडीत सहभागी झाले होते.

बरवें देशवासी झाला। काय बोलता, बोलता?
लाभ लाभ दुप्पट. जिवा झाला दारुषाने॥

सुदैवाने मला संतांची भेट झाली. ते प्रेमाचे पोट होते.
मी तुझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अवघा फळाला आला…

यंदाचे बीज सोहळ्याचे ३७६ वर्षे आहे. या निमित्ताने डोर्लेवाडी परिसरातील, जिल्ह्यातील व राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते. मंदिरात टाळ-मृदंगाच्या तालात अखंड हरिनामाचा गजर सुरु झाला अन् पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्प वर्षाव करून संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला. प्रती देहू समजल्या जाणाऱ्या येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात लाखो भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ बीजेचा सोहळा अनुभवला.

देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त आठ दिवसांपासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब नाळे महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर महाराज लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे बीजेनिमित्त फुलाचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या अलौकिक कार्याचे वर्णन केले. दुपारी १२ वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला. त्याचबरोबर अत्यंत जड अंतःकरणाने भाविकांनी गुलाल पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला.

पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात भव्य मंडप टाकण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती. बारामती शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. सामाजिक संस्था व स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

खासदार सुप्रिया सुळे यांनी तुकाराम बीजेच्या निमित्ताने कार्यक्रमाला हजेरी लावली. त्या पाठोपाठ यावर्षी सुनेत्रा पवार यांनीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांनी संत तुकाराम महाराज यांच्या चरणी १ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुखूट अर्पण केला. तसेच पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक गणेश जाधव यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, येथील यात्रेला त्यांचे पै-पाहुणे, माहेरवासीनी दरवर्षी आवर्जून येतात. मंदिरात दर्शनासह यात्रेचा आनंद कुटुंबासह लुटतात. गावात अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लिम एकत्र नांदत असल्याने यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी तात्पुरता बंद

Wednesday, 28 May 2025, 11:58

मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा ; सावरकरांची बॅरिस्टर डिग्री भारतात आणणार..

Wednesday, 28 May 2025, 11:56

अवकाळीचा फटका; राज्यातील 41 हजार हेक्टर पिक नष्ट

Wednesday, 28 May 2025, 11:37

शिरूर तालुक्यातील करडे एमआयडीसीच्या जमिनीमधून सुमारे वीस लाखांच्या मुरुमाची चोरी…

Wednesday, 28 May 2025, 11:29

भाजपची खेळी ; निवडणुकीत मुंबई – ठाण्यात एकनाथ शिंदेंची तर पुण्यात अजित पवारांचीं कोंडी करणार?

Wednesday, 28 May 2025, 11:21

कर्जत: शेळीपालन व्यवसायाच्या नावाखाली ड्रग्जचा कारखाना, 11 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 28 May 2025, 11:18
Next Post

शिवनेरीवर राजकीय प्रतिस्पर्धी आमने-सामने; आढळराव समोर येताच अमोल कोल्हेंनी वाकून नमस्कार केला अन् आशीर्वादही घेतला...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.