Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यातील करडे एमआयडीसीच्या जमिनीमधून सुमारे वीस लाखांच्या मुरुमाची चोरी…

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 28 May 2025, 11:29

शिरूर : करडे (ता.शिरूर) येथील एमआयडीसी परिसरातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा तब्बल 3300 ब्रास मुरूम अनधिकृतपणे उत्खनन करून चोरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी स्थापत्य विभागाचे उपअभियंता मिलिंद रामचंद्र कासार (वय 56,रा. मीतिलानगरी,पिंपळे सौदागर,पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,16 मे रोजी दुपारच्या दरम्यान उपअभियंता मिलिंद कासार हे करडे एमआयडीसी येथे विविध कामांच्या पाहणीसाठी गेले असता,गट नंबर 115/अ,115/ब, 115/6 आणि 107 या एमआयडीसीच्या मालकीच्या जमिनींमधून अंदाजे 3300 ब्रास मुरूम अज्ञात व्यक्तीने जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काढून नेल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर एमआयडीसी स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मुरूम चोरावर कारवाई व्हावी.यासाठी महसूल विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.मात्र,त्या मुरूम चोरीवर कारवाई होण्यास शिरूरच्या महसूल विभागाकडून उशीर होत होता.अखेर एमआयडीसी स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे निमोणेच्या मंडलाधिकाऱ्यांनी 23 मे रोजी संबंधित मुरूम चोरीचा पंचनामा करून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केला.त्यानंतर मंगळवारी (ता.27) शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात सुमारे 3300 ब्रास मुरूम चोरी केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करडे एमआयडीसीच्या मालकीच्या जमिनीतून चोरी झालेल्या मुरूमाची एकूण किंमत सुमारे 19 लाख 80 हजार आहे.तसेच मुरूम चोरीसाठी जेसीबी व डंपरचा वापर करण्यात आल्याचा संशय एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

या प्रकरणी पोलीस हवालदार शिवाजी भोते हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहेत.

या अवैध मुरूम उत्खनन प्रकरणामुळे महसूल व एमआयडीसी विभागात खळबळ उडाली असून,मुरूम चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.या घटनेमुळे शासकीय जमिनीवरील उत्खननाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

“अशाच पद्धतीने खंडाळेमाथा (ता.शिरूर) येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत दोन्ही बाजूने मोठ्या डोंगरांचे उत्खनन करून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे.या उत्खनावर शिरूर महसूल विभागाने पंचनामा करून दिखावू कारवाई केली आहे.अशी माहिती समोर येत आहे.मात्र,पुढे काय? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.”

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

अवकाळीचा फटका; राज्यातील 41 हजार हेक्टर पिक नष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.