लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा आरोग्यदुत पै. युवराज हिरामण काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त थेऊर येथे सांस्कृतिक व आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये महाआरोग्य शिबिरासह खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा समावेश असून हे कार्यक्रम थेऊर येथील काकडे मळा परिसरात रविवारी (ता.23) सकाळी 9 ते 5 या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आरोग्यदुत युवराज काकडे सोशल फाऊंडेशनने केले आहे.
महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, किडनी तपासणी, डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप, स्त्रीरोग तपासणी, कान-नाक-घसा, हाडांची तपासणी, दातांची तपासणी व औषधे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास मोफत 10 लाखाचा अपघाती विमा देण्यात येणार आहे. हृदय, किडनी, स्त्रीरोग, मोतीबिंदू आणि कान नाक घसा या शस्त्रक्रिया मोफत/सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांकरिता मोफत मॉड्युलर हात / पाय व कॅलिपर्स अपंग, अँप्युटीज, पोलिओग्रस्त आणि गँगरीन ग्रस्त, डायबेटीक फुट लोकांसाठी देण्यात येणार आहे.
दरम्यान, महिलांसाठी खास अभिनेता अॅड. ओम उर्फ सुभाष यादव प्रस्तुत होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाचे रविवारी (ता.23) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आयोजन केले आहे. खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये प्रथम विजेत्या महिलेला टिव्ही (32 इंची) व पैठणी, द्वितीय बक्षीस – कुलर व चांदीचा छल्ला, तृतीय बक्षिस – मिक्सर व सोन्याची नथणी, चतुर्थ बक्षिस-टेबल फॅन, पाचवे बक्षिस – डिनर सेट देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. तर रविवारी संध्याकाळी सहा वाजता स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
अपघातात जखमी झाल्यानंतर रुग्णाला तातडीने रक्तपुरवठ्याची गरज असते. तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर शश्त्राक्रीयेदरम्यान रक्ताची आवश्यकता भासत असते. गंभीर रुग्णांची महत्वाची गरज ओळखून माझ्या वाढदिवसाचा होणारा अनावश्यक खर्च टाळून मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर माता भगिनींना दररोजच्या कामातून थोडीफार मोकळीक मिळावी. म्हणून खेळ पैठणीचा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
पै. युवराज काकडे (सदस्य – थेऊर, ता. हवेली)