पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच आता गुलाल लावून कापलेले लिंबू रस्त्यावर फेकून देत जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकर जुन्नर विधानसभा मतदारसंघात घडला आहे.
जुन्नर तालुक्यातील गोळेगाव फाटा, पांगरी माथा, ओतूर रोडवर गुलाल लावून कापलेले लिंबू रस्त्यावर आढळून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जादुटोणा करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. परंतु हा असा प्रकार कोण आणि कशासाठी केला असेल याबद्दल काही माहिती समजू शकलेली नाही.
दरम्यान, यापूर्वी असा प्रकार जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान आघोरी विद्येचा प्रकार घडला होता. यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत असा जादुटोण्याचा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान जादूटोण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.