अमोल दरेकर
Shirur News : सणसवाडी : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी संसद ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करंदी (ता. शिरूर) येथे गेले दोन दिवस साखळी उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
युवक, शाळकरी विद्यार्थी, महिला, शेतकरी आंदोलनात सहभागी
या आंदोलनात युवक, शाळकरी विद्यार्थी, महिला, शेतकऱ्यांनी सहभागी नोंदवत, करंदी येथील हनुमान मंदिरात आयेजित केलेल्या साखळी उपोषणास पाठींबा दिला.(Shirur News) याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिक्रापूर पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. ग्रामस्थांनी दैनंदिन व्यवहार चालू ठेवले.
राज्यातील परिस्थिती पाहता आपण सर्वांनी संयम राखत सहकार्य करावे तसेच सार्वजनिक परिसरात कोणताही अनुचित प्रकार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. (Shirur News) चुकीचे घडत असेल तर पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले.
या वेळी सागर टाकळकर, प्रदीप ढोकले, निलेश नप्ते, सूरज ढोकले, वैभव ढोकले, नितिन सोनवणे, गणेश मानकर, विकास दरेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला जाहिर पाठिंबा देण्यासाठी साखळी पद्धतीने अन्न त्याग उपोषण केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है; कवठे येमाईत साखळी उपोषणाचा तिसरा दिवस