युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील सकल मराठा समाजाने चक्री उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच सर्वच राजकीय पुढार्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पक्षीय मतभेद विसरून मराठा आरक्षण या मुद्द्यावर सर्व एकत्र
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांवर जाहीर बहिष्कार टाकला आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. २७) सकाळी ग्रामपंचायत पारावर जाहीर बैठक घेण्यात आली. (Shirur News) यावेळी मराठा समाजातील सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते पक्षीय मतभेद विसरून मराठा आरक्षण या एकाच मुद्द्यावर एकत्र आले. यामध्ये पुढील दिशा ठरविण्यात आली. सर्वात प्रथम शिरूर पोलीस ठाणे व नायब तहसीलदार यांना शिरूर येथे मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही अथवा तसा निर्णय होत नाही. (Shirur News) तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची व त्या पुढार्याची राहणार आहे. असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच शनिवार (ता.२८) रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनाला समाजातील सर्वच जातीतील समाजाकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. शिरूर पोलिस व तहसीलदार शिरूर यांना यासंबंधीचे निवेदन मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून देण्यात आले.
मराठा आरक्षणाचे लक्ष…
‘चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते’ ‘मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’.. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणतेही राजकीय पक्ष व नेत्याला गावात प्रवेश नाही. (Shirur News) आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. हा संदेश समाज माध्यमांमध्ये फिरत होता. यावेळी सर्वांकडून हा मंत्र स्वीकारण्यात आला. त्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. असे सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जाहीर केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ॲड. सदावर्तेंच्या प्रतिमेला जोडे मारून धामणीत निषेध..
Shirur News : शिरूर बेट भागातील डीपी चोरी करणारी टोळी अटकेत ; शिरूर पोलिसांची मोठी कारवाई..