Saswad News : सासवड, (पुणे) : पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारी सुमारे पाच हजार कोटींची रक्कम अदानी समूहाने देण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या दोन महिन्यांत पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
शुक्रवारी (ता. २५) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामंत यांनी वरील माहिती दिली.
पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल,’
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पाच हजार कोटी रुपये लागणार आहेत. या जागेचे भूसंपादन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या दोन्हींपैकी नेमके कुणी करावे, यावर चर्चा सुरू आहे. Saswad News
भूसंपादनासाठी लागणारी रक्कम उपलब्ध करून देणे राज्य सरकारला शक्य नाही. ही रक्कम अदानी समूहाने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून, तसा प्रस्तावही दिला आहे. राज्य सरकार त्या निधीतून भूसंपादन करू शकते,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसी, विमानतळ कंपनी आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रितपणे निधी उभारण्यावरही विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते परतल्यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमची एकत्रित बैठक होणार आहे. सर्व शक्यतांचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. असेही सामनात म्हणाले.
दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने पुरंदर तालुक्यात विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विमानतळाची गरज असल्याचे नुकतेच वेगवेगळ्या जाहीर कार्यक्रमात सांगितले. त्यामुळे विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटण्याबाबत आशा निर्माण झाली आहे. Saswad News