पुणे : विद्देचे माहेरघर असलेल्या पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील लोणीकंद येथे राहणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीच्या घरच्यांनी तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी ६ जणांवर शिवीजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१५ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत घोले रोडवरील अपार्टमेंटमध्ये घडला.
याप्रकरणी लोणीकंद येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अभय राठोड, अमोल राठोड, अजिंक्य राठोड, कंठीराम राठोड, कमलाबाई राठोड, केजी राठोड (सर्व रा. जयराम तांडा, ता. कंधार, जि. नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय राठोड याचे तरुणीसोबत २०१५ मध्ये ओळख झाली. यानंतर आरोपी अभय याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. याबाबत तरुणीने अभय याच्या घरच्यांना सांगितले.
त्यावेळी अभयच्या भावाने तरुणीसोबत गैरवर्तन करुन वडिलांनी दमदाटी करुन तरुणीची बदनामी केली. तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.