पुणे : सोशल मीडियावर तरुणाईला सध्या रिल्स बनवण्याचं व्यसन इतकं लागलं आहे. लाईक आणि व्ह्यूजसाठी ही तरुणाई जीव धोक्यात घालतेय. अशातच पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या उड्डाण पुलावर दोन तरुणांनी रिल्स बनवताना आपला जीव धोक्यात घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेसंदर्भात मुद्दा उठवत ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
यावेळी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी ट्विट करत सांगितले की, आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला. कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते.,
दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेच्या नियमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालणे हे किती धाडसाचे आणि योग्य आहे, हे दिसून येत आहे. या घटनेवर पुण्यातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी घरून होळकर गार्डनच्या ऑफिसला निघालो असता अचानक पुलावरचे दृष्य पाहून मला धक्काच बसला…
कारण कात्रज चौकातील प्रस्तावित धर्मरक्षक छत्रपती श्री. संभाजी महाराज उड्डाण पुलावर सुरक्षेचे तीन तेरा नऊ बारा वाजवले जात होते…, pic.twitter.com/jDHWVXlxWM
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) October 25, 2024