Pune News : पुणे : घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाल्याने भोर-महाड या मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंध घाट शुक्रवारपासून (ता. २५) सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडत असतात. यामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने भोर-महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आला होता.(Pune News) २२ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत भोर घाट अवजड वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली होती. मात्र, पावसाने उघडीप दिल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.
भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीबाबत लाल आणि नारंगी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंध घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती. आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आलेले नाहीत. (Pune News) परिणामी वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हडपसर येथे ट्रकचे स्टेअरिंग तुटून, दुभाजकाला धडक; केबिनचा चक्काचूर