Pune News : पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) येत्या २९ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्याच दिवशी आणखी दोन परीक्षा होणार आहेत. एमपीएससी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेसोबत नगरपरिषद भारती परीक्षा आणि महाज्योतीतर्फे यूपीएससी प्रशिक्षणार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षाही २९ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. या तीन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी दोन परीक्षांना मुकणार आहेत. यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण
अनेक विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते मनापासून अभ्यास करत असतात. अनेक विद्यार्थी दुसरी संधी म्हणून अनेक परीक्षांचा अर्ज भरतात. (Pune News ) परंतु या परीक्षांच्या तारखा एकाच दिवशी आल्यास विद्यार्थ्यांची संधी जाते. आता तीन स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. यामुळे परीक्षांचा तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
एकाच दिवशी तीन परीक्षा असल्याने, संधी जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत. एमपीएससी परीक्षेचे वेळापत्रक आधीच निश्चित असते. (Pune News ) महाज्योती आणि नगरपरिषद भरती या संस्थांनी समन्वय साधून परिक्षेच्या तारखांबाबत फेरविचार करण्याची गरज विद्यार्थी व्यक्त करत आहेत. दोन परीक्षांच्या तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ऑनलाइन टास्क देवून ९ लाखांचा ऑनलाइन गंडा; बिबवेवाडीत प्रकार; गुन्हा दाखल