Pune News : पुणे : पुणे नाशिक महामार्गावरून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
चांडोली टोलनाक्यानजिक झाला अपघात
पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातामुळे पुणे, मुंबई आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक गुरुवारी ठप्प झाली. दोन्ही ठिकाणी वाहतूक ठप्प होण्याची कारणे वेगवेगळी होती.(Pune News) या अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी या दोन्ही वाहनचालकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
पुणे शहराकडून नाशिक शहराकडे जाताना चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, (Pune News) अशी माहिती मिळत आहे.
पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरु केले आहे. तसेच दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत सुरु करण्याचे काम सुरु केले आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर दुपारी १२ ते २ आज मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे.(Pune News) मुंबईवरुन गुजरातला जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच कोंडी होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : येरवडा कारागृह पोलीस शिपाई आत्महत्येचे गूढ अखेर उकलले; सहा जणांवर गुन्हा दाखल
Pune News : आयईटीईच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यपदी डॉ. रवींद्र खराडकर यांची निवड.