Pune News : पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा आठवा दिवस असून, पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर उपोषण, मोर्चा, आंदोलने सुरू आहेत. राज्य सरकार अद्याप मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतलेली नसल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आज कडकडीत बंद आणि लाक्षणिक उपोषण करीत, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला.
लाक्षणिक उपोषण देखील केले जाणार
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कडकडीत बंद आणि लाक्षणिक उपोषण करीत मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देण्यात आला आहे. लाक्षणिक उपोषणाबाबत संतोष नांगरे म्हणाले की, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून भाजीपाला, फळे, फुले यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. यातून जवळपास १४ ते १५ कोटींची उलाढाल होत असते. (Pune News) मात्र, मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तरी देखील राज्य सरकारमार्फत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प ठेवण्याचा निर्णय घेऊन लाक्षणिक उपोषण देखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर टायर जाळून आंदोलन करणाऱ्या ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल
Pune News : साखळी उपोषण, बाजारपेठ बंद अन् कँडल मार्च; सणसवाडीत मराठा आंदोलनाची धग कायम
Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय