Pune News : पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात दसऱ्याच्या दिवशी विचारांचे सोने लुटण्याची परंपरा आहे. राज्यात यादिवशी अनेक राजकीय सभा होतात. त्याचदरम्यान तरुणांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दसरा सणाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे ते नागपूर तब्बल ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.
आज श्री क्षेत्र तुळापूर येथे संगमाच्या घाटावर आमदार रोहित पवार यांनी पहाटे साडेपाच वाजता स्नान करून शंभू महादेवाला अभिषेक घातला. तेथे संघर्ष यात्रेला यश मिळवून युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी यश मिळू दे अशी प्रार्थना शंभू महादेवाच्या चरणी केली. (Pune News) छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जात तरूणाईसह त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली. यावेळी आमदार अशोक पवार, रोहित पाटील, देवदत्त निकम यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
युवा संघर्ष यात्रा तुळापूरमार्गे फुलगाववरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली. दरम्यान, पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून, युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा दिला. (Pune News) या मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले.
विशेष बाब म्हणजे पवार कुटुंबात पहिल्यांदाच आमदार रोहित पवार हे सहकुटुंब पदयात्रेत दिवाळी साजरी करणार आहेत. (Pune News) रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती पवार या देखील या वेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, युवा संघर्ष यात्रेचा हा शिरूर हवेली तालुक्यातील पहिला प्रवासाचा टप्पा आहे. (Pune News) दररोज १७ ते २२ किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार आहे. ४५ दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.
या आहेत प्रमुख मागण्या…
– कंत्राटी नोकरभरती रद्द व्हावी.
– २ लाख ५० हजार उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरु कराठी.
– अवाजवी परीक्षा शुल्क रद्द व्हावे.
– जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
– सक्षम आणि कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी रहावी.
– क्रीडा विभागाचे सक्षमीकरण व्हावे.
– होतकरू खेळाडूंना संधी मिळावी.
– पेपरफुटी विरोधात कायदा करावा.
– शाळा दत्तक योजना रद्द व्हावी.
– बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी मिळावी.
– नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे मिळावी.
– समूह शाळा योजना रद्द करण्यासाठी.
– रखडलेल्या नियुक्त्या त्वरित द्याव्यात, यासाठी
– महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणण्यासाठी.
– सारथी, बार्टी, महाज्योती आणि टीआरआयटी संस्थांचे सक्षमीकरण होण्यासाठी.
– नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी.
– सर्व भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करावी.
– प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना असावी.
– शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत.
– असंघटीत क्षेत्रातील युवांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा घ्यावी.
– युवा आयोगाची स्थापना करावी.
– विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह मिळालेच पाहिजे.
– महिलांची सायबर सुरक्षा सक्षमपणे राबिविण्यासाठी.
– तालुका स्तरावर एमआयडीसीची स्थापना आणि अस्तित्वात असणाऱ्या एमआयडीसीच्या सक्षमीकरणासाठी,
– ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली तरुणाईला वाचविण्यासाठी.
या मागण्यांचा पाठपुरावा यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कामावरुन काढल्याच्या रागाने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड