इंदापूर : एक वर्षापासुन पोलीसाना गुंगारा देत असलेला आरोपी नामे सागर उर्फ विकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याला इंदापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सदर फरार आरोपी सागर उर्फ विकास नवनाथ देवकर हा इंदापुर पो स्टे गुरं न ६८४/२०२३ भा.द. वी ३०७,३२४,५०४,५०६ अॅट्रोसिटी ३(१), ३(२) या कलमातील तो मुख्य आरोपी होता. गेली एक वर्षापासुन तो पोलिसांना गुंगारा देत होता.
सदर आरोपी हा दि. 29 जुलै रोजी रात्री ९ वा सुमारास इंदापूर तालुक्यातील काटी गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती मिळताच तात्काळ इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शक सुचना दिल्या.
दिलेल्या सुचने प्रमाणे गुन्हे शोध पथकाने काटी गावामध्ये सापळा रचुन सदर आरोपीस शितापीने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, डी. वाय. एस. पी. डॉ. सुदर्शन राठोड, पोनि सुर्यकांत कोकणे, याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोसई पुडलिंक गावडे, सहा. फौजदार प्रकाश माने, पो. कॉ. गणेश डेरे, पो. कॉ. विशाल चौधर यांनी सदरची कामगिरी पार पाडली.