Helmets mandatory : पुणे: दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करण्याच्या सक्तीला पुणेकरांनी चांगलाच विरोध केला होता. तसेच त्याविरोधात आंदोलने देखील करण्यात आली होती. आता मात्र पुन्हा पुणेकरांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. (Headache again in Pune; Helmets mandatory on May 24)
जनजागृतीसाठी शहर आणि जिल्ह्यात 24 मे रोजी ‘हेल्मेट दिवस’ साजरा करण्यात येणार असून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालय यासह अन्य शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असणार आहे, (Helmets mandatory ) असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त सक्ती
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या चार वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने मोटार वाहन कायद्यानुसार प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. (Helmets mandatory )जागतिक स्तरावर 15 ते 21 मे दरम्यान शाश्वत वाहतूक या विषयासंदर्भात “7 यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक 2023′ साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत रस्ते अपघातांबाबत स्वयंसेवी संस्था, शासन यंत्रणा, प्रसारमाध्यमे, नागरिकांचे लक्ष वेधणे, रस्ते अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना बळकटी देणे याबाबत जनजागृतीसाठी हा सप्ताहाचा हेतू आहे. (Helmets mandatory )
मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 129 नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशानेही हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. (Helmets mandatory ) त्या अनुषंगाने जनजागृतीसाठी या सप्ताहाअंतर्गत लाक्षणिक “हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले असून तशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Collector Pune news : पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : जिल्हाधिकारी
Crime Pune news : विमा कंपन्यांकडून लाखो रिक्षाचालकांची होतेय लूट