खेड: खेड पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti) कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार तनुजा निलेश पवार यांच्या घरासमोर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (pune politics latest news)
मिळालेल्या माहितीनुसार, निघोजे येथील त्यांच्या घरासमोर एका अज्ञात तरुणाने काळी जादू केलेले दोन लिंबू फेकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आली आहे.
हेही वाचा: PCMC News: पिंपरी-चिंचवड मनपाच्या माजी आयुक्तांवर गंभीर आरोप; अडचणी वाढल्या
अधिक माहिती अशी की, दुचाकीवर आलेल्या एका तरुणाने घराच्या प्रवेशद्वाराजवळ जादूटोण्याचे लिंबू टाकले आणि लगेचच तेथून पळ काढला. सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक पातळीवर ही घटना निवडणूकपूर्व दबावतंत्राचा भाग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.







