पुणे : पुण्यातील कोंढवा भागातून चोरीची घटना समोर आली आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख, सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख ६५ हजार रुपयाच्या ऐवज पळवल्याची घटना कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोंढवा भागातून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले आहेत. ही घटना कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. तक्रारदार या सोसायटीत वास्तव्याला आहेत. २४ जानेवारी रोजी फिर्यातदार कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. शनिवारी रात्री (२५ जानेवारी) रात्री अकरा वाजेच्यासुमारास ते घरी परतले असता घरच्या दरवाज्याचे कुलूप तुटल्या दिसले.
चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण साडेसात लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करत आहेत.