पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आता सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर या दरम्यान नवीन बांधलेला उड्डाणपूल लवकरच गाड्यांसाठी खुला केला जाणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे राजाराम पुल ते वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.
विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले असूनही केवळ उद्घाटनासाठी नेतेमंडळींना वेळ मिळत नव्हता त्यामुळे अद्याप
हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. मात्र आता उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे मुहूर्त ठरले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्घाटन होईल. यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येपासून वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.