पुणे: नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या 3 महिलांविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलांवर अनैतिक मानवी व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये (कलम ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अश्लील हावभाव करून रस्त्याने जाणाऱ्यांना वाहनचालकांना थांबवत होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई ज्योती हुलावळे यांनीही फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून आणि नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी हि कारवाई केली आहे. या व्यवसायामुळे महिलांना त्रास होत असल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात रहिवाश्यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती.

नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय झाल्याची ही पहिलीच घटना नाही. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांमुळे होणारा वाहतुकीस अडथळा हि गंभीर समस्या बनली होती. वाहतून कोंडीमुळे परिसरात गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. दरम्यान, या व्यवसायात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.







