उरुळी कांचन, (पुणे) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच पालकांचा शिक्षकासोबत योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. शिक्षक, पालक आणि पाल्य हा त्रिकोण साधल्यास विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडविण्यात फार मोठी मदत होते, असे मत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मांडले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, स्वामी विवेकानंद अकॅडमी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार नुकताच पाडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण बोलत होते.
यावेळी शाळेचे अध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, विश्वस्त संभाजी कांचन, प्रकाश कांचन, पंडित कांचन, धनसिंग कोंदकुले, रवी बडेकर, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना चव्हाण म्हणाले, “मुले घडवण्यासाठी शाळा व शिक्षक यांची जबाबदारी वाढली आहे. तसेच सध्याच्या धावपळीच्या युगात बहुतेक आई-वडील दोघेही नौकरी करतात. नोकरी करीत असल्याने मुलांना हवा तेवढा वेळ देता येत नसल्याची खंत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर आदरयुक्त धाक रहावा यासाठी पालकांच्या सहयोगाची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.