Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये आहे. सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर आझम पानसरे यांनी रविवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
विकासकामांबाबत चर्चा
माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या प्रतिकूल कालखंडामध्ये पक्षाची खिंड लढवली. पिंपरी-चिंचवडमध्ये पानसरे नगरसेवक आणि पदाधिकारी यांना मानणारा गट मोठा आहे. पानसरे यांनी विधानसभा, मावळ लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, गावकी, भावकीच्या राजकारणाचा फटका त्यांना बसला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेत, चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने भाजपमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तेथेही अन्याय झाल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घतला. कालांतराने राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. (Pimpri News) फुटीनंतर पानसरे हे साहेबांबरोबर की दादांबरोबर असा संभ्रम होता. आज पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी पानसरे यांनी भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना मानणारा मोठा गट शहरामध्ये आहे. साहेबांनी शहराचा विकास केलेला आहे. त्यामुळे विकासाचे खरे साक्षीदार ज्येष्ठ नेते हे साहेबांबरोबर आहेत. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी आज सकाळी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. (Pimpri News) साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : “राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण अत्यावश्यक!” : पद्मश्री रमेश पतंगे
Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे-पाटील यांची फेरनियुक्ती