Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : “राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण अत्यावश्यक!” : पद्मश्री रमेश पतंगे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 11:44

प्रदीप गांधलीकर
Pimpri News : पिंपरी  : “शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रभाव जागृत करणारे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले आहे.

चिंचवड गाव येथे ‘शिक्षण कशासाठी आणि शिकायचे काय?’ या विषयावर कार्यक्रम

जागतिक शिक्षकदिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षकांचे ‘शिक्षण कशासाठी आणि शिकायचे काय?’ या विषयावर चिंचवड गाव येथे शनिवारी (ता.७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रबोधन करताना रमेश पतंगे बोलत होते. (Pimpri News) यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, नितीन बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

रमेश पतंगे पुढे म्हणाले की, “‘शिक्षण कशासाठी आणि शिकायचे का?’ या मूलभूत प्रश्नांची उत्तरे कालसापेक्ष आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन या प्रेरणा मनुष्यासह सर्व प्राण्यांमध्ये उपजत असतात; परंतु शिक्षणामुळे माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. वारसा अन् पूर्वपरंपरेने माणसाला अनेक गोष्टींचे संचित ज्ञान मिळते. जीवनसंघर्षामध्ये प्रत्येक माणसाला आपले स्वतःचे स्थान निर्माण करावे लागते अन् त्यासाठीच शिक्षण अनिवार्य असते. समाजरचना ही नित्य प्रवाही असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे या रचनेत बदल होतात. (Pimpri News) तंत्रज्ञानाचा वेग अतिप्रचंड असतो. या बदलांची चाहूल शिक्षकांना घेता आली पाहिजे. लिहितावाचता येणे ही पूर्वीची साक्षरतेची संकल्पना आता खूप बदललेली आहे. ज्ञान ही आजच्या काळातील सर्वात मोठी संपत्ती आहे. दुर्दैवाने भारतात मूलभूत संशोधन करणारे विद्यार्थी खूप विरळ आहेत. त्यामुळे ज्ञानजिज्ञासू विद्यार्थी तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे!”

दुसऱ्या सत्रात डॉ. अशोक नगरकर यांनी संशोधनवृत्ती निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करताना, “संशोधनात पहिल्याच प्रयत्नात भव्यदिव्य निर्माण होण्याची अपेक्षा करू नका; परंतु छोट्या गोष्टींतून अन् सातत्यपूर्ण प्रयोगातून नावीन्यपूर्ण संकल्पना मूर्त स्वरूपात साकार होतात. कोणत्याही विषयात संशोधन करताना जागतिक पातळीवर त्यासंबंधी काय कार्य झाले आहे याचा शोध घ्यावा लागतो. (Pimpri News) बदलत्या भारतात विद्यार्थ्यांचे योगदान आणि त्यामागे शिक्षकांचे प्रोत्साहन आवश्यक आहे. अर्थातच त्यासाठी शिक्षकांनी नेहमी अद्ययावत असले पाहिजे!” अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

 

दरम्यान, यावेळी नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, वर्षा जाधव, स्वप्ना झिरंगे, वैशाली धोंडे, योगिनी शिंदे, योगिश्वरी महाजन, दीप्ती बंदपट्टे, अश्विनी जाधव आदी शिक्षकांनी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. तर गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना समाज अन् देशाच्या उन्नतीसाठी वेगळे आणि कृतिशील असे काय करता येईल, याचा मनाशी शोध घ्या!” असे विचार मांडले.

या कार्यक्रमासाठी अतुल आडे, सतीश अवचार, मारुती वाघमारे आणि गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : ‘ढोलकीच्या तालावर’ची उपविजेती नम्रता सांगुळे हिचा ‘मनसे’तर्फे नागरी सत्कार

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे-पाटील यांची फेरनियुक्ती

Pimpri News : महावितरणच्या धोकादायक वीज वाहिन्या होणार भूमिगत – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

MLA Rahul Kul : दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या रोटीत ४० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पोहोचले पाणी ; आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जल पूजन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp