Pimpri News : पुणे : पिंपरी-चिंचवड मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात सध्या शरद पवार गटाने शिरकाव करण्यास सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार, जयंत पाटील यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. त्यानंतर येत्या मंगळवारी पुन्हा आमदार रोहित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार असून, येथील महत्त्वाच्या व्यक्तींसह काही सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात अजित पवारांपेक्षा शरद पवार गटाचीच चर्चा होत असल्याचे चित्र आहे.
रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे
अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून, वेगळी चूल मांडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात जयंत पाटील, रोहित पवार यांनी दौऱ्याचा धडाका लावला आहे. (Pimpri News ) अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघात शरद पवार गटाची सरशी दिसत आहे. दोन गट पडल्यापासून रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे.
रोहित पवार आणि अजित पवार असे काका पुतण्याचे राजकारण शहरात दिसत आहे. शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी अनेक दिग्गज नेत्यांना शरद पवार गटात सामावून घेतले आहे. (Pimpri News ) आणखी काही नेते त्यांच्या संपर्कात असून, लवकरच शरद पवार आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : ‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ! : डॉ. पी. डी. पाटील यांचे गौरवोद्गार